
बातमी कट्टा:- २६ वर्षीय तरुणाचा खून करुन फरार झालेल्या सहा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. या सहा संशयितांपैकी पाच संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुध्द धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरीचोरी,चोरी, दंगा करणे, अवैध शस्त्र बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दि.8 रोजी रात्री १०.४५ ते ००.०५ वाजेच्या दरम्यान धुळे शहरातील गांधी पुतळयाजवळ घनश्याम ऊर्फ महेश पवार उर्फ लाल डोळा याने घरावर दगड फेक केली याचा जाब शुभम जगन साळुंखे, वय २६ वर्ष, रा. नवनाथ नगर, ५० खोली जवळ धुळे याने जाब विचारला असता त्या कारणावरुन त्यास महेश पवार उर्फ लाल डोळा व त्याचे इतर साथीदार अशांनी पूर्व नियोजित कट करुन हाताबुक्क्यांनी मारहाण करुन मोटार सायकलवर बसवुन वरखेडी रोड वरील मनपा डम्पींग गांऊड येथे आणुन त्यांच्याकडे असलेले धारदार कोयते, लोखंडी रॉड, फाईटर असे प्राणघातक हत्याराने शुभम जगन सांळुखे याच्यावर हल्ला करुन त्यास जिवेटार मारल्याबाबत खूनाचा गुन्हा धुळे येथील आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा, धुळेचे पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून घटनेचा आढावा घेवून फिर्यादी कडे अधिक विचारपुस करून फिर्यादीने सांगितलेल्या संशयितांचा शोध घेतला असता संशयित गणेश अनिल पाटील हा फरार होण्याच्या तयारीत असतांनाच त्यास शिताफीने कॉटन मार्केट, पारोळा रोड धुळे येथुन ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे.
गुन्हयातील मुख्य संशयित १) महेश ऊर्फ घनश्याम प्रकाश पवार वय ३२ रा. स्वामी नारायण कॉलनी, मार्केट यार्ड धुळे याच्या सह २) गणेश साहेबराव माळी वय २० रा. ५० खोली शांती नगर, कॉटन मार्केटच्या मागे धुळे ३) जगदीश रघुनाथ चौधरी वय १८ रा. स्वामी नारायण कॉलनी, मार्केट यार्ड धुळे असे नाशिक येथुन संगमनेर मार्गे पुण्याकडे पसार झाले बाबतची तांत्रीक विश्लेषणाव्दारे माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने सदर संशयितांचा शोध घेत असता ते दिधी येथील मॅग्झीन चौकात मो/ सा सह उभे असल्याचे दिसल्याने व त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने त्यांनी त्यांच्या जवळ असलेली मोटार सायकल सोडुन तेथुन पळ काढला असता त्यांचा पाठलाग करुन वरील तिन्ही संशयितांना शिताफीने मो.सा.सह पकडण्यात आले.
तसेच सदर गुन्हयातील फरार संशयित अक्षय श्रावण साळवे, जयेश रविंद्र खरात उर्फ जब्या असे राजस्थान येथे पसार झाले. बाबतची तांत्रीक विश्लेषणाव्दारे माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ स्थागुशाचे पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने सदर संशयितांचा शोध घेतला असता ते अजमेर हुन इंदोर कडे लक्झरी बसने येत असल्या बाबत खात्रीलायक माहीती मिळुन आल्याने रतलाम येथे येणा-या लक्झरी बसेस चेक करत असतांना एका लक्झरी बस मध्ये (१) अक्षय श्रावण साळवे, (२) जयेश रविंद्र खरात उर्फ जब्या असे मिळुन आल्याने त्यांना पकडण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोराई अमरजित मोरे, असई संजय पाटील, हेकॉ संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप जगन्नाथ पाटील, रविकिरण राठोड, तुषार सुर्यवंशी, प्रल्हाद वाघ, सुशिल शेंडे, शशीकांत देवरे, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, योगेश साळवे, अमोल जाधव अशांनी केलेली आहे.