लोकनियुक्त म्हणजे लोकनियुक्तच… महिला सरपंचाची ग्रामस्थांनी केली पाठराखण…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील वनावल येथील लोकनियुक्त महिला सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठरावावर आज दि 20 रोजी ग्रामसभा घेऊन मतदान करण्यात आले.यात दुपारी 3:30 वाजेपर्यंत गावातील एकुण 1230 मते मतपेटीत टाकण्यात आले होते.दुपारी 3:30 वाजेनंतर दोन तासात मतमोजणी करण्यात आली यात महिला सरपंच यांच्याकडून जनतेने कौल दिल्याने अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील वनावल येथील ग्रामपंचायतीचे  उपसरपंच पूना पौलद भिल व सदस्यांनी १० जून २०२१ रोजी सरपंच भावना पाटील यांच्याविरुद्ध शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस दिलेली होती.या नुसार तहसीलदार आबा महाजन यांनी १६ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वनावल ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेतली होती.यावेळी सदर अविश्वास ठरावाच्या बाजूने आठ सदस्यांनी तर विरोधात फक्त सरपंच यांनी मतदान केले होते.

लोकनियुक्त सरपंच विरोधात सदस्यांकडून बहुमताने अविश्वास ठराव पारीत करण्यात आला होता.मात्र सदर सरपंच ह्या थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांना अपात्र करण्याचा किंवा पदमुक्त करण्याचा अधिकार ग्रामसभेला असल्याने आज दि 20 रोजी वनावल येथे सकाळी विशेष ग्रामसभा बोलवून मतदान करण्यात आले आहे.

दुपार 3:30 वाजे नंतर दोन तासात मतमोजणी करण्यात आली यात एकुण 1230 लोकांनी मतदान केले होते यात अविश्वास ठरावासाठी 524 तर अविश्वास ठरावाच्या विरुध्द 656 ईतके मते पडली तर 55 मते बाद झाली यामुळे 132 मतांनी सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे.

या पध्दतीने झाले मतमोजणी

आज झालेल्या मतमोजणीत 6 मतकेंद्रातील मतमोजणी जाहीर करण्यात आली होती त्यात 1 क्रमांकाच्या मतकेंद्रातील अविश्वास ठरावासाठी 101 मत होती तर अविश्वास ठरावाविरुध्द 84 मते होती,दुसऱ्या केंद्रात अविश्वास ठरावसाठी 114 तर अविश्वास ठरावाच्या विरुध्द 77 मते होती.तर केंद्र क्रमांक तीन वर अविश्वास ठरावासाठी 119 तर अविश्वास ठरावाविरुद्ध 90 मते होती.केंद्र क्रमांक चार वर अविश्वास ठरावासाठी 46 तर अविश्वास ठरावाच्या विरुध्द 116 मते,केंद्र क्रमांक पाचवर अविश्वास ठरावासाठी 104 मते तर अविश्वास ठराव विरुद्ध 114 मते व केंद्र क्रमांक सहावर अविश्वास ठरावासाठी 40 मते तर अविश्वास ठराव विरुध्द 175 मते पडली.

एकुण 1235 मते पडली यात अविश्वास ठरावासाठी 524 तर अविश्वास ठराव विरुध्द 656 मते पडली आहेत तर 55 मते बाद ठरली आहेत.132 मताने सरपंचांवर असलेला अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: