लोकांना गुंगी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गुंगीराक औषधांसह गुजरात येथील संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- लोकांना गुंगी आणण्यासाठी वापरण्यात येणारे गुंगीकारक औषधाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या गुजारात येथील एका संशयिताला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या औषधाचा नशेसाठी वापर होत असतो.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना अन्न व औषध प्रशासनानचे औषध निरीक्षक यांनी माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे नाशिक ते नागपूर रोडवर शेलबारी शिवारातील हॉटेल सरकार समोर पांढऱ्या रंगाची जि.जे 23 टी 2610 क्रमांकाची पिकअप पोलिसांनी थांबवली.पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता गाडी वैद्यकीय सल्लाशिवाय विक्री करण्यास प्रतिबंध असलेले गुंगीकारक 120 औषधांच्या सिलबंद बॉटल मिळुन आले.यावेळी पोलीसांनी संशयिताला नाव विचारले असता त्याने नाझिम इब्राहिम पटेल वय 29 वर्ष रा.कांझा फाटक,व्यारा गुजरात असे सांगितले.सदर गुंगीराक औषधाचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असतो

पोलिसांनी 14 हजार 400 किंमतीचे 120 गुणगीकारक औषधीचे सिलबंद बॉटल व 3 लाख 20 हजार किंमतीच्या पिकअपसह संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.औषध निरीक्षक शाम काळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: