वंचित शेतकरी सभासदांना कर्ज द्या ,शिरपूर तालुका विकासो चेअरमनांचे अमरीशभाईंकडे साकडे

बातमी कट्टा : धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेकडून या वर्षी फक्त नियमित कर्ज घेणाऱ्या सोसायटी सभासदांनाच कर्ज दिले गेले परंतु वंचित व नवीन सभासदांना कर्ज वाटप झाले नाही त्या संदर्भात तालुक्यातील विविध कार्यकारी सह सोसायटी चेअरमन शिष्ठ मंडळाने राज्याचे माजी शिक्षण मंत्री आ श्री अमरिशभाई पटेल यांची भेट घेतली. नियमित कर्ज घेणारे शेतकरी सभासद ज्यांनी मधल्या काळात काही कारणास्तव कर्ज घेतले नाही अशा इच्छुक सभासदांना २-३ वर्षांपासून बँकेने कर्ज वाटप बंद केले आहे. तसेच नवीन सभासंदाना देखील काही वर्षांपासून बँक कर्ज देत नाही.

सेवा सोसायट्या आधीच आर्थिक अडचणीत चालत असतांना वंचित व नवीन शेतकरी सभासदांना कर्ज वाटप होत नसल्याने सोसायटींना नफा कसा मिळेल? आर्थिक अडचणीत सापडलेल्या काही सोसायटींना सचिवांचे पगार देखील करता येत नाहीत. गावातील शेतकरी सभासदांचे गाऱ्हाणे सोसायटी चेअरमनांनी आ श्री अमरिशभाई पटेल यांचा कडे मांडले, सविस्तर माहिती घेऊन श्री पटेल यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन श्री राजवर्धन कदमबांडे यांना भ्रमणध्वनीद्वारे यावर मार्ग काढण्याचे सांगितले व तात्काळ मदत म्हणून अल्प कर्ज तरी सभासदांना द्यावे म्हणून आदेश दिलेत. शिरपूर तालुक्यातील सोसायटी चेअरमनांनी आ श्री अमरीशभाईंचे आभार मानले.

यावेळी होळनांथा सोसायटीचे चेअरमन प्रकाशसिंग सिसोदिया, थाळनेर चेअरमन रमेश मराठे, बोरगांव चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया, बोराडी चेअरमन राज निकम, तऱ्हाडी चेअरमन प्रशांत पाटील, जातोडा चेअरमन भरतसिंग राजपूत, वाठोडा चेअरमन मंगलसिंग गिरासे, कृउबा माजी सभापती नारायण चौधरी, अहिल्यापूर चेअरमन प्रेमसिंग राजपूत, बाळदे चेअरमन हिरामण पाटील, वनावल चेअरमन अमृत पाटील, अजितसिंग जमादार थाळनेर, सोसायटी संचालक सुरेंद्र देशमुख अमोदा, जितेंद्रसिंग राऊळ वनावल व शेतकरी सभासद उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: