
बातमी कट्टा:- कालपासून बेपत्ता असलेल्या वडीलासह बहिण भाऊचा तापी नदीत पात्रात मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी 10 :30 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

शेंधवा जवळील झापोली येथील हरसिंग भिमसिंग देवरे वय 35 हे आपल्या कुटुंबासोबत शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथे मोलमजुरी कामासाठी आले होते.काल दि 8 रोजी हरसिंग भिमसिंग देवरे वय 35 व त्यांचा मुलगा आकाश हरसिंग देवरे व मुलगी नवसी देवरे वय 10 हे घरातून बेपत्ता होते.त्यांचा सर्वत्र शोध सुरु असतांना आज दि 9 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास हरसिंग भिमसिंग देवरे वय 35 व त्यांचा मुलगा आकाश हरसिंग देवरे व मुलगी नवसी देवरे वय 10 यांचा आज सकाळी नेवाडे गावाजवळील तापी नदीपात्रात मृतदेह मिळुन आला. मृत अवस्थेत तीघांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत मयत हरसिंग देवरे यांचे मोठे भाऊ दिनेश सरदार देवरे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनात नोंद केली असून या तिघांच्या मृत्यू मागील नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
