वनावल गटातील गावांमध्ये विकासकामांचा धडाका !!

बातमी कट्टा:- प्रत्येक गावाचा विकास व्हावा अशी दुरदृष्टी ठेऊनच गटातील प्रत्येक गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.स्थानिक विकास निधीतून गटातील नागरीकांची मागणी असणाऱ्या विकास कामांचे भुमिपूजन करण्यात येत असून जनतेच्या सेवेसाठी नेहमीच जिल्हा परिषद सदस्य सौ.अभिलाषा पाटील कटीबध्द असल्याचे प्रतिपादन शिसाका संचालक तथा माजी पं स.सदस्य भरत भिलाजी पाटील यांनी केले.दि 16 रोजी वनावल गटातील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा दरम्यान ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,जनेतेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ.अभिलाषा पाटील या नेहमीच तत्पर असतील.गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकास कार्य पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.प्रत्येक गावाचा विकास व्हावा अशी दुरदृष्टी ठेऊनच गटातील प्रत्येक गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल,आमदार काशीराम पावरा, शिरपूर न.प. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, जि.प.उपाध्यक्ष कुसुमताई निकम,शिक्षण सभापती मंगलाताई पाटील, महिला बालकल्याण सभापती धरतीताई देवरे,समाज कल्याण सभापती मोगराताई पावरा, कृषी सभापती संग्राम पाटील,माजी नगरसेवक अशोक कलाल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या सहकार्यातुन व मार्गदर्शनाखाली वनावल गटाचे जिल्हा परिषद सदस्या सौ.अभिलाषा भरत पाटील यांच्या जिल्हा परिषद स्थानिक विकास निधीतून विकास कामांचे भुमिपूजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भरत पाटील यांनी केले.

वनावल गटातील खर्दे पाथर्डे येथे अमरधामकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,बाळदे येथे नवीन अमरधाम बांधणे व सुख-सुविधा करणे,जातोडे येथे अमरधामकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण व पशुवैद्यकीय दवाखाना वॉल कंपाऊंड करणे,बोरगाव ते वाघाडी कच्चा रस्ता नवीन करणे,वनावल येथे कॉंक्रीट रस्ता करणे,रुदावली येथे नवीन पाण्याची टाकी बांधणे,वनावल ते रुदावली रस्ता नवीन डांबरीकरण करणे,रुदावली ते टेंभे रस्ता नवीन सुधारणा करणे तसेच अमरधाम व नवीन वर्ग खोली बांधणे,चांदपुरी येथे मंदिर परिसरात फेवर ब्लॉक बसवणे,खामखेडा येथे वॉटर फिल्टर व फेवर ब्लॉक बसवणे आदी विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले.

आमदार काशिराम पावरा,शिरपूर शहराचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या शुभहस्ते व शिसाका संचालक तथा माजी पं स. सदस्य भरत भिलाजी पाटील,खामखेडा येथील पंचायत समिती उपसभापती राजेंद्र पाटील, जातोडा येथील माजी पंचायत समिती उपसभापती जगतसिंग राजपूत,भरवाडे येथील शिरपूर साखर कारखाना व्हाईस चेअरमन दिलीप दगडू पटेल, बाळदे येथील पंचायत समिती सदस्या विठाबाई निंबा पाटील तसेच भरवाडे येथील पंचायत समिती सदस्या ममता ईश्वर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी खर्दे येथील सरपंच सुनील भास्कर पाटील,बाळदे येथील उपसरपंच निंबा दादा,राजू पाटील,जगदीश पाटील, जातोडा येथील सरपंच भाऊसाहेब सिताराम धनगर, उपसरपंच दर्या सिंग राजपूत,बोरगांव येथील सरपंच काशिबाई भिल, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, वनावल येथील सरपंच भावना मनोहर पाटील, उपसरपंच परशुराम धनगर, रुदावली येथील सरपंच संजू भिल,उपसरपंच पितांबर पाटील तसेच परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी वरिष्ठांकडून विकास कामे मंजूर करून घेतल्याबद्दल भरत पाटील यांचे आभार मानले.

WhatsApp
Follow by Email
error: