बातमी कट्टा:- आज दि.11सप्टेंबर 2021रोजी जिल्हा परिषद वनावल गटातील बाभुळदे व साकवद या ठिकाणी शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, विकासरत्न व विधान परिषद आमदार मा. श्री अमरिशभाई पटेल साहेब व शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. उपाध्यक्ष के.डी. पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत भिलाजी पाटील उपस्थित होते.त्यांनी लोकांना शिबिराचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले.व जि.प. गटाकडून पटेल परिवाराचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास बाभुळदे येथील सरपंच सौ. भिमाबाई माधव पाटील, उपसरपंच संजीव विक्रम पाटील, ग्रा. सदस्य योगेश सुभाष महाजन, ग्रा.सदस्य श्रीमती.विठाबाई युवराज पाटील, ग्रा. सदस्य श्रीमती.शोभा बाई सुरेश निकुंबे, पोलीस पाटील महेंद्र नवल दोरिक, केंद्रप्रमुख शे.पा.निकुंबे, माजी उपसरपंच ताराचंद हरकलाल पाटील,सामाजिक कार्यकर्ता दशरथ तुकाराम महाजन, सामाजिक कार्यकर्ता युवराज आत्माराम पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी अशोक विठोबा पाटील, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच साकवद या ठिकाणी माजी प. स.सदस्य मनोज सोनवणे, सरपंच गजू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोळी, ग्रामसेवक.आर. आर.ठाकरे सामाजिक कार्यकर्ता संतोष गिर गोसावी,आकाश भिल,दारीकराव भिल, मगन भिल, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.