वनावल गटात विकास कामांचे खा.हिना गावीतांच्या हस्ते उद्घाटन

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील भरवाडे व गिधाडे या दोन गावांमध्ये धुळे नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार आदरणीय अमरीशभाई पटेल साहेब व शिरपूर शहराचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनातून पाण्याची टाकी व पाईपलाईन या विकास कामांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची टाकी व पाईप लाईन या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार लोकसभा खासदार मा. डॉ. हिनाताई विजयकुमार गावित, शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे,शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई गावित, वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषाताई भरत पाटील, मा. पं. समिती सदस्य भरत भिलाजी पाटील, मा.भाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंधे, शि. सा. का.व्हाईस चेअरमन दिलीप दगडू पटेल, शिरपूर पंचायत समिती मा. उपसभापती जगतसिंग राजपूत, शिरपूर पंचायत समिती मा. सभापती राजेंद्र पाटील,पं. समिती सदस्या ममता ईश्वर चौधरी , पं. समिती सदस्या विठाबाई निंबा पाटील, भरवाडे येथील सरपंच भारतीताई पटेल व गिधाडे येथील सरपंच आशाबाई वाघ इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते सदर भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषाताई भरत पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषद धुळे येथून सदर कामाला निधी मंजूर करण्यात आला. यावेळी परिसरातील भरवाडे येथील उपसरपंच अविनाश पटेल, ग्रामपंचायत सदस्य अनिता पटेल, दत्त मंदिर अध्यक्ष मोहन पटेल, संजय चौधरी, लखन चौधरी, गिधाडे येथील उपसरपंच राकेश पाटील, मा.सरपंच देवा दादा, पोलीस पाटील नारायण वाघ, टेंभे येथील सरपंच देवा जिभो, बाळदे येथील उपसरपंच निंबा दादा, खर्दे पाथर्डे सरपंच सतीश पाटील,उपरपिंड येथील सरपंच योगेश पाटील, परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: