“वर्दीत”ला “दर्दी” माणूस..बातमी वाचून तुम्ही ठरवा हे कर्तव्य कोणाचे होते.

बातमी कट्टा:- निवडणूका आल्या की राजकीय मंडळी हात जोडून जनतेसमोर मतदानासाठी झोळी पसरवतांना आपण बघत असतो.मात्र एकदा का निवडणूक संपली की त्या जनतेच्या दुखात ते नेतेमंडळी कधीही सहभागी होत नाही आणि सहभागी झाले पण तर फक्त दोन सब्द बोलण्यासाठीच आता तुम्ही बघाना दि 29 रोजी दोन घरे जळून खाक झाली दोन घरांचा संसार अचानक उघड्यावर आला.अशात कोणाच्या साहनुभूती पेक्षा त्यांना मदतीची जास्त गरज आहे.मात्र एकही राजकीय मंडळींनी अशी मदत केली नाही.मात्र त्या दोन कुटुंबांना धिर देण्यासाठी अखेर पोलीस निरीक्षकांनीच एक पाऊल पुढे टाकत माणूसकी जोपासली.कारण अशा परिस्थितीत फक्त पोलीस निरीक्षकच कामात आले.जनता,सामाजिक कार्यकर्ते हे अशा परिस्थितीत पुढे येतील पण राज-का-रण करणारे कुठेत हा प्रश्न उपस्थित होतो.

शिंदखेडा तालुक्यातील रहिनपुरे येथे शेतकरी विश्वास पाटील व निंबा पाटील यांच्या घराला दि. 29 रोजी सुमारास गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती.यात दोन्ही घरांचा संसार उघड्यावर पडला आहे.जे काही होत त्या सर्वांची राखरांगोळी झाली होती. विश्वास पाटील व निंबा पाटील यांच्या घरे पूर्ण पणे जळुन खाक झाली होती. ही परस्थितीची जाणीव दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना झाली.आणि त्यांनी माणूसकी जोपासत त्यांच्याकडून किराणा साहित्य भेट देऊन त्या परिवाराचे सांत्वन करून आधार दिला आहे.मुळात मताची भिक मागणारे नेते मंडळींनी कुठलाही मदतीचा हात पुढे केला नाही. काही मंडळी त्यांचे सांत्वन करण्यासाठी तर गेले पण फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला. संसाराची पुर्णता राखरांगोळी झाल्याने सर्व काही जळून राख झाली.त्यांना गरज होती तर.प्रत्यक्ष मदतीची आणि मदत एका पोलीस निरीक्षकाने केली.
पोलीस अधिकारीचे कर्तव्य बजावत असतानाच पीआय तिवारींनी जोपासलेली माणुसकीचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, वाहन चालक संजय गुजराथी, पोलीस पाटील राजेश बेडसे, माजी सरपंच दिनेश बेडसे, मनोहर पाटील, नकुल पाटील, विश्वास पाटील, निंबा पाटील, चंद्रकांत पाटील मुकेश पाटील, उखा पाटील आदी उपस्थित होते.

आता या कुटुंबाना वेळीच अशी मदत करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न पडला तर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगा.. .

WhatsApp
Follow by Email
error: