
बातमी कट्टा:- दोंडाईचा येथील बसस्थानक मुख्य रस्त्यावरील शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनीचा ओढणीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.सदर विद्यार्थ्यांनीचे नाव वैशाली तापीदास गावित वय १९ रा. पिंपळे पोस्ट खडकी ता. नवापूर येथील असून शहरातील अहिंसा पॉलिटेक्निकल कॉलेज येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षांची परिक्षा देत होती.

वैशाली गावित ही नवापूर तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी होती.काल दि 15 रोजी 9 ते 1 वाजेदरम्यान परिक्षा देऊन वैशाली दोंडाईचा येथील शासकीय वसतिगृहात आली होती.मात्र सायंकाळी अचानक वस्तीगृहाच्या रुममध्ये पंख्याला ओढणीच्या साहय्याने गळफास स्थितीत वैशालीचा मृतदेह एका मुलीला दिसून आला.कनिष्ठ लिपिक कैलास धनगर यांना घटनेची माहिती मिळताच वसतिगृहाच्या प्रमुख असलेल्या गृहपाल रिना जाधव यांना याबाबत माहिती कळविली.मात्र जाधव या धुळे येथे टपाल देण्यासाठी गेल्याने रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहचलेले नव्हते.

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस कर्मचारी संदीप कदम, धिरज काटकर, नरेंद्र शिरसाट आदी घटनास्थळी दाखल झाले होते.वैशाली गावित हिचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी अर्जुन नरोटे यांनी मृत घोषित केले.मात्र अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नसून चौकशी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.या आधी याच वसतीगृहात शासकीय वसतिगृहातील कु. भारती डेमशा पावरा मु. सोन खु.पो.सुरवाणी ता.अक्राणी जि.नंदूरबार येथील विद्यार्थिनीचा दि 22 /9/219 रोजी जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.