
बातमी कट्टा:- हॉटेलमधून जेवनकरून मोटरसायकलीने परतत असतांना भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलीला धडक देत दोन युवकांना चिरडल्याची घटना काल दि 12 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील मारवाडी गल्लीजवळ राहणारे पार्थ सुनील सोनार वय 15, निल धर्मेंद्र पटेल वय 20 आणि जयेश धर्मेंद्र पवार वय 22 हे काल दि 12 रोजी रात्री 11 वाजता जेवन करुन परतत असतांना मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या जवळ अज्ञात भरधाव वाहनाने मोटरसायकलीला धडक देत दोघांना चिरडले.यात पार्थ सोनार व निल पटेल या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर जयेश पवार हा जखमी झाला आहे.
निल पटेल याचा दि 11 रोजी वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त दि 12 रोजी मित्रमंडळींना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलवर जेवणाची पार्टी देण्यात आली होती.रात्री 11 वाजेच्या सुमारास जेवन करुन ते निल पटेल पार्थ सोनार व जयेश पवार परतत असतांना शिरपूर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञात भरधाव वाहने त्यांना धडक दिली यात निल व पार्थ दोघांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू तर जयेश पवार जखमी झाला.टोलनाकाच्या रुग्णवाहिकेने त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी निल व पार्थ दोघांना मयत घोषित केले तर जयेश पवार याला पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले आहे.
