वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु,शेतकरी म्हणाले त्यावेळी दादाभुसेंना भेटलो मात्र मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांचे काम होत नाही…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात काल झालेल्या वादळी वारासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तीन महिन्यापूर्वी देखील अशाच पध्दतीने नुकसान झाले होते. शासनाकडून मात्र भरपाई मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.एका शेतकऱ्याने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी शेतीचे नुकसान झाल्याने पिकविमा काढलेला असतांना पिकविमा कर्मचारी व अधिकारींनी लक्ष दिले नव्हते.यासाठी शेतकरी त्यावेळचे कृषी मंत्री दादा भुसेंना भेटले होते.मात्र आजपावेतो त्याचा मोबदला भेटलेला नाही. मंत्र्यांना भेटुन शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नसणार मग शेतकऱ्याने कोणाकडे जावे असा संतप्त प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

बघा काय म्हणालेत शेतकरी https://youtu.be/xc7oG75mtRY?si=HILVfQqb1MCtTU-k

शिरपूर तालुक्यात काल दि १२ रोजी सातंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.शिरपूर तालुक्यातील एकुण ३३ गावांमधील शेतकऱ्यांचे अंदाजे २८७ शेतकऱ्यांचे सुमारे २०५.१५ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी,गहु,बाजरी,मका ,कांदा, केळी,पपई निंबु पेरु भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

बघा काय म्हणालेत शेतकरी https://youtu.be/xc7oG75mtRY?si=HILVfQqb1MCtTU-k

बघा काय म्हणालेत शेतकरी https://youtu.be/xc7oG75mtRY?si=HILVfQqb1MCtTU-k

कुवे येथील कैलास बाबुराव पवार या शेतकऱ्याने गेल्यावर्षी केळीची लागवड केली होती.काल अचानक वादळी वाऱ्यांसह गारपीटीमुळे २५०० केळीचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले. कैलास पवार म्हणालेत गेल्यावेळेस देखील निसर्गाने साथ न दिल्याने अशाच पध्दतीने नुकसान झाले होते.दोन ते तीन वर्षांपूर्वी २० ते २५ हजार भरुन पिकविमा काढला होता त्यावेळेस हरभारा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र पिकविमा कंपनीने लक्ष दिले नाही वारंवार सांगून दुर्लक्ष करण्यात आले.त्यावेळेसचे कृषिमंत्री दादाभुसे यांना भेटून तक्रार केली होती.दादाभुसे यांना संबधीत अधिकारींना संपर्क केला होता मात्र आजतोवर त्या पिकविमा संदर्भात कुठलाही मोबदला मिळालेला नाही.मंत्र्यांना भेटून काम होत नसणार तर कोणाकडे जाव ? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.त्यामुळे शेतकरी कैलास पवार यांनी तेव्हापासून पिकविमा काढलेला नाही. 

बघा काय म्हणालेत शेतकरी https://youtu.be/xc7oG75mtRY?si=HILVfQqb1MCtTU-k

बघा काय म्हणालेत शेतकरी https://youtu.be/xc7oG75mtRY?si=HILVfQqb1MCtTU-k

अशाच पध्दतीने कालच्या वादळी वाऱ्यामुळे कुवे येथील चंद्रसिंग राजपूत यांचे देखील पपई पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तोडणीला आलेली पपईचे अनेक झाड जमीन दोस्त झाल्याने अंदाजे दोन अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी देखील चंद्रसिंग राजपूत यांच्या पपई पिकाचे नुकसान झाले होते.शेताजवळ असलेले चंद्रकांत पाटील यांच्या शेतातील केळी बागेचे नुकसान झाले आहे. यासोबतच गावातील अनेक शेतकऱ्यांचे कालच्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले.

बघा काय म्हणालेत शेतकरी https://youtu.be/xc7oG75mtRY?si=HILVfQqb1MCtTU-k

WhatsApp
Follow by Email
error: