वादळी वाऱ्यासह पाऊसाची हजेरी,विजेचे पोल,तार,झाडे रस्त्यावर…

बातमी कट्टा:- आज सायंकाळ पासून वादळी, वाऱ्यासह पाऊसाने कहर केले आहे.दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यावरील उभे विजेचे खांब व झाडे रस्त्यावर कोलमडून पडले आहेत.

धुळे जिल्ह्यातील काही भागात देखील वादळी वारासह पाऊसाने हजेरी लावली आहे.दिवसभर उकाडा जाणवत असतांना सायंकाळपासून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली होती.जिल्ह्यातील काही ठिकाणी सायंकाळीच पाऊसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी रात्री 8:30 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती.

शिरपूर तालुक्यासह नरडाणा परिसरात देखील पाऊसाने हजेरी लावली आहे.दोंडाईचासह नंदुरबार रोडवरील गावांच्या दिशेने शनिमांडळ, रजाळे गावाकडील परिसरात सायंकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे.

शिंदखेडा,अलाणे,देगांव सह परिसरात रात्री 8:25 वाजेनंतर वादळी वारासह पाऊसाने हजेरी लावली आहे. तर मध्यप्रदेशच्या दिशेने पानसमल व खेतीया परिसरात देखील वादळी वारासह पाऊस सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: