बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील काही भागात आज अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊसाने हजेरी लावली. शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील काही भागात गारपीटासह पाऊसाने हजेरी लावली.यात शेतीसह काही ठिकाणी घरांसह झाडांची व विजपोलांची पडझड झाल्याची प्राथमिक प्राप्त झाली आहे.
आज दुपारी धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील काही भागात अचानक वादळी वाऱ्याने हजेरी लावली.वादळी वारा सुरु असतांनाच अचानक सह पाऊसाने हजेरी लावली. काही भागात प्रचंड नुकसान झाले आहे. शिरपूर तालुक्यातील चांदपुरी,टेंभे,करवंद,शिंगावे परिसरातील भागांमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. टेंभे गावातील दोन घरांची पडझड झाल्याचे समजते तर याभागात झाडे देखील कोसळले आहेत.करंवद परिसरात देखील प्रमाणात नुकसान झाले आहे.करवंद गावात देखील झाडे व पोलांचे नुकसान झाले आहे.
पाऊसासह आलेल्या गारपिटमुळे शेतातील केळी, हरभरा, गहु,पपई पिंकाचे प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.गारपिटमुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.काही ठिकाणी रात्री 8 वाजेच्या सुमारास देखील पाऊसाने हजेरी लावल्याचे सांगितले जात आहे.



