
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात वाळू तस्करीने अक्षरशः कहर केले आहे. रात्रंदिवस सुरु असलेल्या तस्करीत लाखोंची उलाढाल होत आहे.विशेष म्हणजे या वाळू तस्करी बाबत संबंधित अधिकारींकडून मात्र कुठल्याच प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही.यात वाळू तस्करी संदर्भात का कारवाई होत नाही ? सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे सुरु असलेला खेळ का थांबवला जात नाही ? काही आर्थिक हितसंबंध तर नाहीत ? असं असणार तर मग कारवाई न करणाऱ्यांची देखील जिल्हाधिकारींकडून चौकशी होणे अपेक्षित आहे.
शिरपूर तालुक्यातील उप्परपींड वाळू घाटात सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे वाळू उत्खनन करण्यात येत आहे.रात्री वाळूची चोरटी वाहतूक सुरु आहे. वाळू उत्खनन मुळे नदींमध्ये मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने भविष्यात मोठ्याप्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे. सायंकाळनंतर देखील रात्रभर वाळू भरणे सुरु आहे. भरलेली वाळू रात्री डंपरने वाहतूक सुरु आहे.
नदीत पोकलेन मशीन द्वारे वाळूचे डंपर भरण्यात येत आहे. सर्रास सुरु असलेला हा काळाबाजार रोखण्यात मात्र प्रशासन अपयशी ठरत आहे.उप्परपींड येथील वाळु घाटात सुरु असलेला काळाबाजाराकडे कानाडोळा का केला जात आहे. बिनधास्त वाळू वाहतूक करा कोणी कारवाई करणार नाही याची गॅरंटी घेण्यात येत आहे.इतकी गॅरंटी कोणाच्या कृपेने घेतली जाते ? प्रशासनातील संबंधित अधिकारी नेमकं काय करताय हा प्रश्न उपस्थित होत आहे
धुळे जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात दखल घेणे अपेक्षित आहे.या वाळू तस्करीत कोण कोण हात काळे करत आहेत. याचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. फक्त कारवाई नाही तर शिक्षा होणे देखील गरजेचे आहे. कोणीच काहिच करु शकत नाही असा गैरसमजातून सुरु असलेला गोरखधंदा थांबवणे जिल्हाधिकारींच्या हातात आहे.खर तर या संपूर्ण प्रकरणावर संबंधीत अधिकारींकडून केव्हाच कारवाई होऊन नियमात वाळू घाट चालवणे अपेक्षित होते.मात्र उप्परपींड वाळू घाटातून संबंधित अधिकारींना लक्ष्मी प्राप्त झाल्याची सध्या चर्चा सुरु आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता जिल्हाधिकारी यांच्याकडेच कारवाईची अपेक्षा करत आहे.