बातमी कट्टा:- शिरपूर शहर हद्दीतील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 14 वाहनांवर वाहतूक शाखा प्रभारी यांच्या उपस्थितीत शिरपूर येथे कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी सपोनि संगीता राऊत यांनी आज 14 रोजी शिरपूर शहर पोस्ट हद्दीतील 14 वाहनांवर मोटर वाहन कायद्याखाली अवैध प्रवाशी वाहतूक नुसार कारवाई करण्यात आली आहे.सोबत हेकॉ ज्ञानेश्वर पाटील,नागरे,आरिफ शेख,मन्सुरी,वाघ, जितू पाटील,देवरे,मनोहर महाले,जावेद,शिंदे,प्रसन्ना व क्युआरटी पथक व ईचलन टेक्निशियन पुष्पेन्द्र शिरसाठ सह आदींनी कार्यवाही केली आहे.यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये खळबळ उडाली आहे.