वाहनाच्या धडकेत पुलाखाली पडल्याने तरुणाचा मृत्यू

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील पुलावर मित्रासोबत पायी चालणाऱ्याला भरधाव मालवाहक टेम्पोने जोरदार धडक दिल्याने तरुणाचा पुलाखाली पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दि 19 रोजी रात्री घडली आहे.

उखा मच्छिंद्र कोळी वय 25 रा.सांगवी ता.शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,उखा कोळी यांचा शालक राजा भगवान कोळी(बामणे) वय 22 रा वडगांव ता.गोगान जि.खरगोन मध्यप्रदेश हा त्याचा मित्र धर्मेंद्र रामसिंग पावरा यासह कामानिमित्त शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे दि 19 रोजी सायंकाळी उखा कोळी यांच्या घरी आला होता.

दि 19 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उखा कोळी हे त्यांचा शालक राजा कोळी आणि धर्मेंद्र पावरा आदी जण सांगवी गावात पायी फिरण्यासाठी गेले होते.रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी गावासमोरील उड्डाणपूलावर( ब्रिज) तिघे ही जण पायी चालत असतांना शिरपूरकडून शेंधवाअडे जाणाऱ्या एम.एच 18 बीजी 8680 क्रमांकाच्या मालवाहतुक करणाऱ्या टेम्पोने राजा भगवान कोळी यांस मागुन जोरदार धडक दिल्याने राजा कोळी उड्डाणपूलाच्या खाली फेकला गेल्याने राजा कोळी याचा जागिच मृत्यू झाला तर धर्मेंद्र हा रस्त्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता राजा कोळी याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर धर्मेंद्र याला धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आसून पोलीसांनी टेम्पो जप्त केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: