विकासासाठी “आमदार” पोहचले डोंगरमाथ्यावरील त्या गावात….

बातमी कट्टा:- विकास कामे मतदारसंघातील शेवटच्या गावापर्यंत पोहचली पाहिजे हे ध्येय डोळ्या समोर ठेवून आ.कुणाल पाटील यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातील धुळे आणि नाशिक जिल्हयाच्या सिमेवरील धुळे तालुक्यातील पिंपरखेड ह्या छोटीसी वस्ती असलेल्या गावात विकासाची कामे करुन विकासापासून कोणतेही गाव वंचित राहणार नाही ह्याचे उदाहरण लोकप्रतिनीधी समोर मांडले आहे.

डोंगरमाथ्यावर वसलेलं धुळे तालुक्यातील पिंपरखेड हे गाव आ.कुणाल पाटील यांच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येते.धुळे तालुक्यातील पश्‍चिमेला मतदारसंघाच्या सिमेवरील हे गाव असून तेथून पुढे नाशिक जिल्हयाची हद्द सुरु होते. या गावापर्यंत पोहचायला आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने सुस्थितीत रस्ता आहे. पिंपरखेड येथे नुकतेच आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते मुलभूत विकासाच्या कामांचे उद्धाटन व भूमीपुजन करण्यात आले.यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, तालुक्यातील प्रत्येक गाव डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील विकास कामांचे नियोजन आम्ही करीत असतो. मतदारसंघात अनेक छोट्याछोट्या लोकवस्तीची गावे आहेत अशी गावे समृध्द आणि स्वयंपूर्ण व्हावीत म्हणून विकास कामांबरोबर ही गावे लोकप्रवाहात यावीत म्हणून प्रयत्न केला जातो. कोणतेही गाव विकासपासून वंचित राहणार नाही यांचीही काळजी घेत असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

यावेळी आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्याने मंजुर करण्यात आलेल्या कामांचे उद्घाटन व भूमीपुजन केले गेले.त्यात सभामंडप(10 लक्ष रुपये),एल.ई.डी.लाईट (1 लक्ष रुपये), पुरुष मुतारी(2लक्ष रुपये), शाळा खोली(9 लक्ष रुपये),स्ट्रीट लाईट(10 लक्ष रुपये), पेव्हर ब्लॉक बसविणे(1 लक्ष रुपये) या कामांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.चे माजी गटनेते पंढरीनाथ पाटील, काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, संचालक बापू खैरनार, ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील आनंदा शेवाळे, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, आनंद पाटील नेर, जि. प. सदस्य भाया पारधी,युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे,गणेश जयस्वाल,डॉ.विजय देवरे, देऊर सरपंच दिगंबर देवरे,डॉ.रविंद्र पाटील, गावातील ज्येष्ठ नेते केदार शार्दुल,युवक काँग्रेसचे पंकज पाटील, अनिल पाटील,संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, भटू वाघ, दगा पाटील, कारभारी पाटील, रावसाहेब पाटील, सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच मूलचंद अहिरे, आक्काबाई बोरसे, देवाजी अहिरे, मिराबाई पाटील, दगा पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रकाश भामरे, मधुकर पाटील, गोकुळ वाघ, तुषार पाटील,साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: