विजेचा तार तुटल्याने आठ एकरातील ऊसाला आग…

बातमी कट्टा:- शेतातून गेलेल्या विजेचा तार तुटल्याने अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात तीन ते चार शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

व्हिडीओ वृत्तांत

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे दि.16 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भूपेंद्र शिवदास निकम यांच्या शेतातून गेलेल्या विजेचा तार अचानक तुटला यामुळे शेतातील ऊस पिकाने आगिचा भडका घेतला.आग विजवण्यासाठी दोंडाईचा येथून तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावेळेत आगीने शेतकरी भूपेंद्र शिवदास निकम, अनिल काशिनाथ पाटील तसेच सुभाष शिवदास निकम यांच्या आठ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. अग्नितांडवचा रौद्ररूप बघता परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते.आगीची बातमी गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले होते. महावितरण विभागाकडून घटनास्थळाची पाहणी करत तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन बंद करण्यात आली होती. झालेल्या नुकसानी बाबत महावितरण विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

On youtube
WhatsApp
Follow by Email
error: