बातमी कट्टा:- शेतात असतांना अंगावर विज कोसळल्याने 27 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून महिलेला शवविच्छेदनासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.

धुळे जिल्ह्यात आज सायंकाळपासून अवकाळी पावसासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे.जिल्ह्यातील रब्बी पिके आणि फळबागा उध्वस्त झाल्या आहेत.या दरम्यान धुळे तालुक्यातील बोरसले येथील शितल राकेश गिरासे या 27 वर्षीय विवाहित महिला सायंकाळच्या सुमारास शेतात असतांना अचानक अंगावर विज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.मयत शितल गिरासे यांना ग्रामस्थांनी सोनगिर येथे रूग्णालयात दाखल केले तेथून शवविच्छेदनासाठी धुळे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.मयत शितल गिरासे यांचे माहेर शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील असून त्यांना एक लहान दिड वर्षाचा मुलगा व मोठी मुलगी आले आहे.शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.