बातमी कट्टा:- शेतात गहू काढण्याचे काम सुरु असतांना अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु होऊन विज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची घटना काल दि 8 रोजी सायंकाळी घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात विज कोसळल्याची घटना घडली आहे. जुनवणे परिसरात शेतकरी ज्ञानेश्वर नागराज पाटील हे परिवारासोबत राहतात त्यांची जुनवणे परिसरात शेती आहे.काल दि ८रोजी शेतात गऊ पिक कढण्याचे काम सुरु होते.
मात्र सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर विजांचा कडकडाट सुरु झाला.यादरम्यान शेतकरी ज्ञानेश्वर पाटील व केवळबाई देवराम पाटील यांच्या अंगावर विज कोसळली.यात ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला तर केवळबाई पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.