विज बिल वसूलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत कोंडले…

व्हिडीओ

शेतकऱ्यांचे विजबिल खंडीत केल्यानंतर देखील त्या शेतकऱ्यांकडे सक्तीच्या वसूलीसाठी आलेल्या विद्युत विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याची घटना घडली आहे.दुष्काळी तालुका जाहीर झाला असतांना सक्तीची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार तालुक्यात विद्युत वितरण कंपनी कडून शेतकऱ्यांकडे बाकी असलेल्या वीजबिलासाठी सक्तीची वसुली सुरू आहे ज्या गावातील शेतकऱ्यांचे वीज बिल बाकी आहेत. त्या गावातील शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मरचा विद्युत सप्लाय कट केला जात आहे.यामुळे रब्बीच्या पेरणी केलेल्या पिकांची नुकसान होणार आहे.अशातच वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही शेतकऱ्यांकडे सक्तीच्या वसुलीसाठी आलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकऱ्यांनी भालेर ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले आहे विद्युत वितरण कंपनीचे पाच कर्मचारी आज सकाळपासूनच सक्तीची वसुली करत असल्याचं समजल्यानंतर परिसरातील शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बसून बाहेरून कुलूप लावले. सरकारने नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर केल्यानंतरही विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी सक्तीची वसुली करत आहेत दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये असा सरकारचा आदेश असतानाही कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

On youtube
WhatsApp
Follow by Email
error: