विज वाहीनीची तुटलेल्या तारमुळे 26 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू…!

बातमी कट्टा:- शेतात जात असतांना रस्त्यावर पडलेल्या विज वाहीनीची तुटलेल्या तारमुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जिव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सुझलॉन कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्याला जिव गमवावा लागला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.

मिळालेली माहिती अशी की,साक्री तालुक्यातील पेटले येथील तरुण शेतकरी योगेश शुकलाल शेवाळे वय 26 हे काल सकाळी पटेल शिवारात ट्रॅक्टर घेऊन जात असतांना रस्त्यावर सुझलॉन कंपनीच्या वीज वाहीनीचे तार तुटून पडलेली होती.त्या विजेचा ताराचा धक्का लागून योगेश शेवाळे याचा जागिच ठार झाला.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी लोकांची गर्दी झाली.सुझलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी योगेश शेवाळे यांना जिव गमवावा लागला घडलेल्या घटनेनंतर देखील सुझलॉन कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत यामुळे उपस्थित नागरिकांनी शेतकरी योगेश शेवाळेला न्याय मिळे पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.

अखेर सुझलॉन कंपनीच्या अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मयत योगेश शेवाळे यांना 11 जून रोजी मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: