बातमी कट्टा:- गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले विद्यार्थी विद्यापीठ स्तरीय पी.एचडी पेट परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाची पी.एचडी संदर्भातील पेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पोस्ट ग्रॅज्युएट च्या विषयानुसार परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरला. परंतु काही विद्यार्थी हे दोन विषयात पोस्टग्रज्युएट असल्यामुळे त्यांना दुसऱ्या विषयात पेट परीक्षेच्या ऑनलाइन प्रक्रियेला अडथळा निर्माण होत होता. दोन विषयात पि.जी.असणाऱ्या विद्यार्थ्यांना account with given information already exist असा संदेश प्राप्त होत होता. म्हणून अनेक विद्यार्थी इच्छा असून सुद्धा दुसऱ्या विषयाच्या फॉर्म भरू शकत नव्हते. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. गेल्या काही दिवसापासून विद्यापीठाच्या पदाधिकारी यांना सुद्धा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थी संपर्क साधत होते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करून विद्यापीठातील सिनेट सदस्य अमोल मुरलीधर सोनवणे यांनी या अडचणी संदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्रव्यवहार केला. तसेच भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कुलगुरूंची चर्चा केली. आणि कुलगुरूंनी या अडचणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणून येत्या काही दिवसात दोन विषयात पोस्टग्रज्युएट असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होऊ शकतो. आणि विद्यार्थ्यांना दोन विषयात पी.एचडी पेट परीक्षेसंदर्भातील ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो.
