बातमी कट्टा:- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा विभागातील वीज कर्मचारी,अधिकारी, सभासद व मित्रपरिवार यांनी दि ०४ रोजी रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषारजी रंधे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या 44 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती.तर ज्या रक्तदात्यांना यावेळी युनियन कडून आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच दोंडाईचा विभागातील पदाधिकारी व सभासद वर्ग यांनी दिनांक.3 रोजी दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले होते.दरवर्षी युनियन मार्फत विविध सामाजिक कार्य होत असतात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मज्जीत खाटीक, महेश सोनार, नरेंद्र सुरेशसिंग गिरासे, निलेश माळी, ज्ञानेश्वर गिरासे, दिलीप बिरारी यांचे विशेष योगदान लाभले.