विमाच्या आड गरजुंचा खिमा ! अवैध सावकाराकडे सापडले कोट्यावधींचे घबाड !!

बातमी कट्टा:- धुळे येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केले आहे. कारवाईत एक कोटी 42 लाखांची रोकड,46 लाख रुपयांचे दागिन्यांसह तीन बँकेतील लॉकर व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.तर एलआयसी एजंट असलेल्या या खाजगी सावकारी करणाऱ्या राजेंद्र बंब याला पोलीसांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे खाजगी सावकारी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

व्हिडीओ बातमी

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे पोलीसांना अवैध सावकारा विरोधात एक तक्रार प्राप्त झाली होती.त्या तक्रारीच्या आधारे धुळे आर्थिक गुन्हे शाखेने एका अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यांचे मोठं घबाड उघड केले आहे.धुळे शहरातील राजेंद्र बंब या एलआयसी एजंट च्या विरोधात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी राजेंद्र बंब याच्या ताब्यातून एक कोटी 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, 46 लाख रुपयांचे दाग दागिने जप्त करण्यात आलेले आहेत तसेच बंब यांच्या कार्यालयातून 38 कोरे चेक, 104 खरेदीखत, 13 सौदा पावत्या, 33 कोरे स्टॅन्ड आणि 204 एफडी केल्याची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आलेली आहेत. तर बँकेतील तीन लोकांची तपासणी बाकी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे.कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडल्यानंतर अजून तीन बँकेच्या लॉकरमध्ये काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राजेंद्र बंब नंतर याप्रकरणातील तपासात अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता पोलीस अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: