बातमी कट्टा:- धुळे येथे विरपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे सुशोभीकरणाचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.या सुशोभीकरणा मुळे महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचा संपूर्ण परिसर सुंदर व सुशोभीत झाला.यासाठी महाराणा प्रतापसिंह स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी या सुशोभीकरणासाठी मदत करणारे महापौर,आयुक्त,भाजपा महानगरप्रमुख यांचा सत्कार केला.

धुळे शहरात नुकतेच राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला.या सुशोभीकरणा मुळे हा परिसर सुंदर आहे सुशोभीत झाला आहे.आज दिनांक 3 रोजी सर्व विरशिरोमणी महाराणा प्रतापजी स्मारक समिती धुळेचे पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्याचे शिल्पकार महापौर चंद्रकांत सोनार,मनपा धुळे आयुक्त अजीज शेख आणि धुळे भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांचे ऋण निर्देश,शाल,श्रीफळ व सत्कार करून महानगपालिकेत आभार व्यक्त केले.
यावेळी दादासाहेब कोर, दिलीपसिंग राजपुत, प्रा.विजयसिंग सिसोदिया,अजित राजपुत,जगदीश राणा, तेजपालसिंग गिरासे, गणेश कोर,मनजीत सिसोदिया,महेंद्रसिंग सिसोदिया, अँड शैलेश राजपुत,सचिन राजपुत,आशिष सिसोदिया, पृथ्वीराज पवार,पुष्कर राठोड आदीजण उपस्थित होते.
