बातमी कट्टा:- विवाहित महिलेचा राहत्या घरात दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना काल दि 10 रोजी दुपारी घडली असून याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे भटेसिंग लालसिंग राजपूत रा.भिलाली ता.अमळनेर जि.जळगाव यांनी दिलेल्या माहिती नुसार भटेसिंग राजपूत यांचे दोन्ही मुले कुटुंबासोबत दोंडाईचा येथील विदयानगर येथे राहतात.काल दि 10 रोजी भटेसिंग राजपूत हे गणेश चतुर्थी निमीत्त दोंडाईचा येथील मुलांकडे आले होते.
दि.10 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सर्व कुटुंब घरातील हॉलमध्ये बसलेले होते त्यावेळी भटेसिंग यांची सुन मंगला देवेंद्र राजपूत या घरातील बेडरूम मध्ये गेल्या व आतून दरवाजा लावून घेतला. तेव्हा हॉल मध्ये सर्व कुटुंब बसून गप्पा मारत असतांना जोरात दरवाजाचा आवाज आल्याने सर्व जण बेडरूम कडे पळाले.बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता तेव्हा बेडरुमच्या खिडकीतून बघितले असता मंगला या बेडरुम मधील छाताच्या फँनला कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने गळफास घेवून लटकलेला दिसला तेव्हा बेडरुमचा दरवाजा तोडून मंगला राजपूत यांना खाली उतरवून दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मंगला राजपूत यांना मृत घोषीत केले असल्याची खबर भटेसिंग राजपूत यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
या घटने मागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.