विषारी नागाच्या पोटातून एक दोन नव्हे तर चक्क सात अंडी काढली बाहेर,बघा व्हिडीओ व वाचा सविस्तर..

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:-धुळे तालुक्यातील कापडणे येथील एका शेतातील कोंबडीच्या खुराड्यात विषारी नागाने प्रवेश करीत कोमडीची सात अंडी फस्त केली. यावेळी सर्पमित्र कुणाल माळी यांनी या विषारी नागाला पकडत त्याच्या तोंडातून सात अंडी बाहेर काढत या सर्पाला जीवदान दिले.


येथील रस्त्यालगत कापडणे येथील युवा शेतकरी कमलेश विश्वनाथ पाटील यांचे शेत आहे. या शेतात पाटील यांनी गुरांच्या गोठ्यातच गावरान कोमडीचा खुराडा बनवला आहे. या खुराड्यात एक कोमडी व अंडी होती. यावेळी विषारी नागाने प्रवेश करताच कोमडीने पळ काढला व खुराड्यात ठेवलेली सात अंडी फस्त केली. यावेळी नेहमीप्रमाणे कमलेश पाटील शेतात गेल्यावर कोमडीच्या खुराड्यात नाग बसलेला दिसला. यावेळी पाटील यांनी सर्पमित्र कुणाल माळी यांना संपर्क साधत शेतात बोलावून घेतले.

बघा व्हिडीओ


यावेळी सर्पमित्र माळी यांनी या विषारी नागाला खुराड्यातून शिताफीने बाहेर काढत त्याच्या तोंडातील अंडी बाहेर काढून घेतली.नागाने सात अंडी एका मागे एक गिळल्याने त्याची हालचाल मंदावली होती.
(महिनाभरात पकडले वीस पेक्षा जास्त सर्प)
कापडणे गावातून व शेत शिवारातून कुणाल माळी यांनी पावसाळा सुरू झाल्यावर महिन्याभरात वीस पेक्षा जास्त विषारी, बिनविषारी सर्प पकडले. यात दामन, दिवळ, मण्यार, नाग, कवळ्या आदी प्रजातींचा समावेश आहे. यात कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध रूम मधून मध्यरात्री मण्यार सर्प पकडला असल्याची माहिती सर्पमित्र कुणाल माळी यांनी दिली.

व्हिडीओ बातमी


सध्या पाऊस सुरू असल्याने सर्प गोठ्यात अथवा शेतातील बंद खोलीत प्रवेश करतो. यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी सावधगिरी बाळगून काम करावे. शेतात काम करत असतांना लक्ष देऊन काम करावे.
(कुणाल माळी, सर्पमित्र कापडणे)

WhatsApp
Follow by Email
error: