विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह…

बातमी कट्टा:- गावालगत असलेल्या शेतातील विहीरीत एका अज्ञात तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना काल दि 22 रोजी घडली आहे. नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने घातपातची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले गावापासून दोनशे मिटर अंतरावर शेतकरी छगन बंडू तिरमले यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत दि 22 रोजी दुपारच्या सुमारास नग्न अवस्थेत एकाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचा दिसून आला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विखुर्ले येथील पोलीस पाटीलांसह योगेंद्र राजपूत दाखल झाले त्यांनी तात्काळ दोंडाईचा पोलीसांना घटनेची माहिती दिली.पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहीरीच्या बाहेर काढण्यात आला.नग्न अवस्थेत मृतदेह असल्याने अनोळखी व्यक्तीची ओळख पटू शकलेली नव्हती.घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
पोलीसांकडून मृतदेह कोणाचा याबाबत शोध सुरु आहे. मात्र विहीरीत नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर मृतदेह दोंडाईचा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: