
बातमी कट्टा- विवाहित महिलेचा शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना दि 24 रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून पाणी भरण्यासाठी गेले असतांना पाय घसरल्याने विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची पोलिस स्टेशनात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि २३ रोजी रात्री शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील अश्विनी रवींद्र गिरासे या २५ वर्षीय विवाहितेचा गावाजवळील असलेल्या विहीरीत मृतदेह आढळून आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील एकनाथ हिलाल पाटील, सरपंच शरद भास्कर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अश्विनी गिरासे यांचा मृतदेह बाहेर काढत शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
याप्रकरणी भटुसिंग दगेसिंग गिरासे यांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनात नोंद केली असून पाणी भरण्यासाठी गेले असतांना पाय घसरुन विहीरीत पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. मयत आश्विनी गिरासे यांचे माहेर शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील होते.