वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

बातमी कट्टा:- वीज थकबाकी असल्याने महावितरण विभागाकडून शिरपूर तालुक्यातील 58 ट्रान्सफार्मर वरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.ऐन हंगामात वीज वितरण कपंनीने विज पुरवठा खंडीत केल्याने शिरपूर तालुक्यातील वाडी,वाघाडी, चांदसे, बलकुवे, भरवाडे, टेकवाडे, टेंभे परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी शिरपूर शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला.

व्हिडीओ वृत्त

पिंकाना पाणी देण्याचा ऐन हंगामात महावितरण कंपनीने थकीत विजबिल असलेल्या ट्रान्सटफार्मरचा विज पुरवठा खंडीत केला तालुक्यातील 58 ट्रान्सटफार्मरवर मसावितरण कंपनीने कारवाई केली.यामुळे शेतकऱ्यांना शेतात पाणी देतात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.काल संतप्त शेतकऱ्यांनी समासेविका डॉ. सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विभागाच्या मुख्य कार्यालयबाहेर ठिय्या दिला.

शेतकरी महावितरण विभागात आल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर संबधितांना शिरपूर शहर पोलीस स्टेशनात बोलवले.पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना शेतकऱ्यांनी सांगितले की,महावितरण विभागाने कुठलीही नोटीस न देता वीजपुरवठा खंडीत केला.महावितरण विभागाने बिलांपोटी पाच हजारांच्या रक्कमेची मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी ती भरली मात्र त्याची पोचपावतीही मिळालेली नाही.पैसे भरून घेतल्यानंतर 15 दिवसातच आणखी 5 हजार रुपये भरण्यास सांगितले जात आहेत. पिकांना पाणी भरण्याच्या ऐन हंगामात विज कंपनीने ट्रान्सटफार्मर वरचे पुजपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना सांगितले.

Youtube

विज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकरी पुर्णता हवालदिल झाला आहे.याबाबत समाजसेविका डॉ. सरोज पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण विभागाच्या वरीष्ठांशी चर्चा केली.मात्र त्यात कुठलाही तोडगा निघालेला नाही.पुढच्या एक ते दोन दिवसात विजपुरवठा सुरु झाला नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: