वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याने केला सुनेवर गोळीबार !

बातमी कट्टा:- वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून किरकोळ वादातून सासऱ्याने सुनेवर पिस्तूलने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात जखमी अवस्थेत उपचार सुरु असतांना महिलेचा मृत्यू झाला आहे याबाबत पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई :- मिळालेल्या माहिती नुसार ठाणे येथील राबोडी परिसरातील एका व्हिआयपी इमारतीत काशीनाथ पाटील हे पत्नी,दोन मुले,सुना व नातवंडांसह राहतात.दि 14 रोजी सकाळी काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा पाटील यांच्यात वाद निर्माण झाला.सीमा पाटील यांनी वेळेत नाश्ता दिला नाही या कारणावरून सासरे काशीनाथ पाटील आणि सीमा पाटील यांच्यात घरगुती किरकोळ वाद झाला.यावेळी काशीनाथ पाटील यांनी स्वताकडील पिस्तूलातून सून सिमा पाटील यांच्यावर गोळीबार केला.

यात सिमा पाटील गंभीर जखमी झाल्या त्यांना तात्काळ उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले तर संशयित सासरा काशीनाथ पाटील घटनास्थळावरुन फरार झाला. उपचार सुरु असतांना सिमा पाटील यांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला आहे.याबाबत ठाण्यातील राबोडी पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून शोध सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: