
बातमी कट्टा:- विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी मैदानी खेळाची आवश्यकता असल्याने किसान विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने १९७१ सालापासून व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सव साजरा करण्यात येत असतो.या तीन दिवसीय व्यंकटेश क्रिडा महोत्सवाला ५० वर्ष पुर्ण झाल्याने यावर्षी सुवर्ण महोत्सव म्हणून व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सव साजरा करण्यात आला आहे.
शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या असंख्य विद्यार्थी आजतागायत पोलिस,भारतीय सैनिक हे देशसेवेच्या कार्यात तत्पर आहेत.किसान विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी विभागीय स्तर असो व राज्य स्तरावर विविध खेळात नाव लौकीक मिळवले आहे. पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या व्यंकटेश क्रिडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यात नाविन्यपूर्ण विद्यार्थी या व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सवात सहभाग घेतात.
संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहावं,त्यांचे मानसिक आणि शारीरिक विकास व्हावा हा मुळ हेतू डोळ्यासमोर ठेऊन व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्याकडून सांगण्यात आले.
व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सवाचे सचिव रोहित रंधे म्हणालेत की , यापूर्वी व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सवात सहभागी झालेले अनेक विद्यार्थ्यी आज देश सेवेत सहभागी झाले आहेत तर काही पोलिस म्हणून कार्यरत आहेत याचा अभिमान वाटतो.आणि क्रिडा महोत्सवाच्या माध्यमातून यापुढे देखील असेच कार्य सदैव सुरु राहणार आहे.५० वर्ष पुर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव म्हणून व्यंकटेश क्रिडा व कला महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे रोहित रंधे यांनी सांगितले.