व्हाईट कॉलर पतीकडून पत्नीचा छळ…

बातमी कट्टा:- व्यवस्थित कपडे धुता येत नाही आणि प्रेस ही करता येत नाही व चारित्र्यावर संशय घेऊन वाईट शिवीगाळ करत मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी सासरच्या मंडळींविरूध्द महिलेने गुन्हा दाखल केला आहे.

इदगाह नगर शिरपूर येथील माहेर असलेल्या महिलेने फिर्यादीत म्हटले की त्यांचे वसिमशेख कलीम रा.विट्टाभटी जवळ देवपूर धुळे यांच्या सोबत 9/7/2020 रोजी विवाह झाला होता.विवाह झाल्यापासून व्यवस्थित कपडे धुता येत नाही आणि प्रेस ही करता येत नाही व चारित्र्यावर संशय घेऊन वाईट शिवीगाळ करत मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ करू लागले म्हणून महिलेने वसिमशेख कलीम,कलीमशेख यासीन शेख, हुसेना बाप यासीन शेख, आयेशा बाप यासीन शेख,भिका शेख,परवीनबी याकुब शेख,सुलताना मतीन शेख सर्व रा. विटाभट्टी जवळ देवपूर धुळे यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: