बातमी कट्टा:- पोलीसांकडून तपासणी सुरु असतांना एक व्हिआयपी ओपन जीप पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असतांना चालकाने जिप न थांबवता भरधाव पळवली मात्र पोलीसांनी टोलनाक्याजवळ त्या जीपला थांबवले असता जिप मध्ये 2.5 किलो वजनाचा गांजा, गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळुन आले.पोलीसांनी जिप मधील दोघांना ताब्यात घेतले आहे.

दि 28 रोजी महाशिवरात्रीच्या पुर्वसंध्येला मोहाडी पोलीसांकडून मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहनाची तपासणी सुरु होती.रात्री 8 वाजेच्या सुमारास पोलीस पथक लळींग टोलनाक्याच्या अलीकडे दरीया हॉटेल जवळ तपासणी करत असतांना धुळे कडून मुंबईकडे जाणारी एम.एच 16/7151 क्रमांकाची हुड नसलेली केसरी रंगाची ओपन जीपला पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असतांना चालकाने जीप न थांबवता पळ काढला पोलीसांनी सदर वाहनाला टोलनाक्याजवळ थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 17 हजार 500 किंमतीचा 2.5 किलो गांजा,15 हजार किंमतीची गावठी पिस्तूल व 200 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस पोलीसांना मिळुन आले.पोलीसांनी जिप वाहनातील नदिम मोहम्मद शमीम सिद्दीकी वय 32 रा. उलवे नवी मुंबई व असलखान अलीयारखान पठान वय 40 रा.महु मध्यप्रदेश या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रम शिंदे,सा।पोलीस निरीक्षक अशोक पायमोडे,किरण कोठावदे,प्रकाश जाधव,मुकेश मोरे,चेतन माळी,शाम काळे,प्रकाश ब्राम्हणे,राहुल पाटील, गणेश भामरे,जितेंद्र वाघ,सचिन वाघ,धिरज गवते,राहुल गु़ंजाळ,जय चौधरी आदींनी केली आहे.
