
बातमी कट्टा:- महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जंयतीनिमीत्त धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जयंती साजरी करण्यात येत आहे. आज दि 2 जून रोजी शिरपूर येथे जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली काढत शहरातील करवंद नाका परिसरात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांचे शंभर फुटी बॅनर झळकले. शहरातील करवंद नाका परिसरात क्रेनच्या साहाय्याने महाराणा प्रतापसिंहजी यांचे बॅनर झळकवण्यात आले.यावेळी मोठ्याप्रमाणात बघणाऱ्यांनी गर्दी केली होती.तर सायंकाळी शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
