बातमी कट्टा:- नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर तांबे हे धुळ्यात आले होते.शहरातील शिक्षक भवन येथे कार्यकर्त्यांच्या वतीने सुधीर तांबे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी सुधीर तांबे बोलतांना म्हणाले की लवकरच सत्यजित तांबे उमेदवारीची भूमिका मांडू असं आमदार सुधीर तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
यावेळी त्यांनी धुळे आणि साक्री तालुक्यात विविध समाज घटक, संघटनांच्या बैठकीत व्यापक समर्थकांनाच आवाहन केले.राजकीय भूमिका मांडण्याबाबत मात्र त्यांनी सावध भूमिका घेतली.कुठल्याही पक्षाबद्दल त्यांनी वक्तव्य करण्याचे टाळले. मी असो कींवा सत्यजित असो आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. राजकारणात काही डावपेच चालू राहतात.मतदारांंच्या अपेक्षांना आपण पूर्ण उतरणार असल्याची ग्वाही सुधीर तांबे यांनी यावेळी दिली.यावेळी पत्रकारांशी बोलतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लवकरच आपली राजकीयभूमिका जाहीर करण्याचे स्पष्टीकरण सुधीर तांबे यांनी यावेळी दिले आहे.