बातमी कट्टा:- नाकाबंदी दरम्यान पोलीसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला पोलीसांनी पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून तब्बल सहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात शिरपूर शहर पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
आज दि २१ रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर शहर पोलीसांंनी शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात नाकाबंदीची कारवाई सुरु केली होती.या कारवाई दरम्यान एक ईसम मोटरसायकलीने येत असतांना पोलीसांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीसांना हुलकावणी देऊन भरधाव वेगाने पळून जात असतांना शिरपूर शहर पोलीसांनी पाठलाग करत शिताफीने त्या संशयितास ताब्यात घेत विचारपूस केली तेव्हा त्याने त्याचे नाव शक्तीसिंग चैनसिंग सरदार रा.दत्तीया राज्य मध्यप्रदेश हल्लीमुकाम महादेव जवाईपाडा ता.शिरपूर असे सांगितले.
पोलीसांना त्याच्यावर संशय आल्याने ताब्यात घेऊन विश्वासात घेत अधिकची विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून चोरीच्या सहा मोटरसायकली मिळुन आल्या आहेत. या दोन पल्सर,सुपर सपलेनडर,एच.एफ डिल्क्स दोन आणि एक शाईन असा एकुण तीन लाख पन्नास हजार किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारींच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर तांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बार्हे,ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, गोवींद कोळी,विनोद अखडमल, प्रविण गोसावी,मुकेश पावरा,प्रशांत पवार,होमगार्ड नाना अहिरे मिथुन पवार,चेतन भावसार,शरद पारधी आदींनी कारवाई केली आहे.