#व्हिडीओ ,शिरपूरात हिंदू जन आक्रोश मोर्चा

व्हिडीओ

बातमी कट्टा:- वालकरची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताब पुनेवाला याला फाशीची शिक्षा द्यावी व लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यात यावा यामागणीसाठी शिरपूर शहरात हिंदुत्ववादी संघटनातर्फे हिंदु जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडोंच्या संख्येने महिला पुरुष युवक युवतींननी सहभाग नोंदवला होता.

शिरपूर शहरातील पाटीलवाडा येथून दि 24 रोजी हिंदुत्ववादी संघटनेंकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.पाटील वाडा पासून पाचकंदील मार्गे प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले की जिहादी मानसिकतेतून श्रध्दा वालकरची हत्या झाली असून आफताबला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्यात यावा.अशा कृत्यांसाठी देहदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिरपूर शहरातील पाटील वाडा पासून निघालेल्या या हिंदू जन आक्रोश मोर्चात विविध घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला होता.युवतींच्या हस्ते प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: