
बातमी कट्टा:- एस व्ही एस एस कृषी महाविद्यालय, दोंडाईचा येथील कृषिदुतांचे शनिमांडळ ता.जि.नंदुरबार गावात आगमन झाले. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत अंतिम वर्षाचे विद्यार्थी कल्पेन आवारे, अक्षय बुटे, अक्षय महाले, भुषण सावंत, अभिषेक शिरसाठ, शुभम ठाकरे, हितेश निकवाडे हे शनिमांडळ येथे दाखल झाले असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कृषिदुत हे गावात राहणार असून, शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे प्रात्यक्षिकांसह आयोजन करणार आहेत. यात शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, आधुनिक तंत्रज्ञान, पिकांवर येणार कीड रोग संबंधित माहीत व त्यांचे निवारण, तण व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करतील. त्यांच्या समवेत सरपंच संतोष आत्माराम पाटील, उपसरपंच संभाजी बळीराम माळी, माजी सरपंच योगेश मोरे, ग्रामसेवक टी. के. खरे यांच्यासह इतर ग्रामस्थांची भेट घेऊन या कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट व त्यासंबंधीत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. बी. राजपूत, उपप्राचार्य आर.बी.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. एल. ए. गिरासे, कार्यक्रम अधिकारी प्रा.आय. पी. गिरासे, व प्रा. एस. व्ही. सुरडकर यांचे मार्गदर्शन लाभले.