
बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातून शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या दोन संशयितांना शिरपूर तालुका पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले आहे.त्यांच्या ताब्यातून मॅगझीनसह चार बनवाट पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.दोन्ही संशयित सातारा जिल्ह्यातील असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गोपणीय माहिती प्राप्त होती की दोन दाढी असलेले संशयित पिस्तूल घेऊन शिरपूरकडे जात आहेत.सा.पोलीस निरीक्षक खलाणे यांनी तात्काळ उपस्थित पोलीसांना माहिती देत कारवाईच्या सुचना दिल्या.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला असता दोन ईसम संशयितरित्या दिसून आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघेही फरार होत होते.पोलीसांनी शिताफीने पाठलाग करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असतांना त्यांच्याकडे मॅगझीनसह चार बनवाट पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे मिळुन आली.त्यांची नावे विचारली असता निलेश गायकवाड आणि मनिष सावंत रा.कराड जि.सातारा असे सांगितले दोघांना ताब्यात घेत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय अधिकारी सचिन हिरे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक जयेश खलाणे,उपनिरीक्षक संदीप पाटील,सुनील वसावे,मंगला पवार,संदिप ठाकरे,संजय भोई,योगेश मोरे,संतोष पाटील,इसरार फारुकी आदींनी केली आहे.
