बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील निमझरी रस्त्यावरील इंजिनिअरिंग कॉलेज मागे एका चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे.
सदर मृतदेहास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.खुमानसिंग बियाण पावरा वय 51 रा.न्यु बोराडी हल्ली मुक्काम विद्याविहार नगर शिरपूर असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते शहरातील आर सी पटेल शैक्षणिक संस्थेत शिपाई म्हणून आंबे खंबाळे येथे नोकरीस होते. शनिवारी सकाळी ते साडे आठ वाजेच्या सुमारास आंबे खंबाळे येथे ड्युटी वर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले.दरम्यान सकाळी 10 वाजेच्या सुमारास निमझरी रस्त्यावरील इंजिनिअरिंग कॉलेज मागे एका चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांचा मुलगा विशाल खुमानसिंग पावरा यांने 1 वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. शशिकांत पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय लखन भुशिंगे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास कुंदन पवार करीत आहे.
