बातमी कट्टा:- शिरपूर शहादा रस्त्यावर भरधाव वेगाने असलेल्या कारने वरुळ जवळ बुधवारी सकाळी कन्या माध्यमिक विद्यालय समोर एस टी महामंडळाची बसला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला असून अपघातात वाहनाने नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
शिरपूर आगाराची बस क्रं एम एच -06एस 8611 सकाळी 11 वाजेच्या सुमारास तऱ्हाड कसबे हुन कन्या शाळेत विद्यार्थींना घेऊन आली असतांना मुली उतरत असतांना शिरपूर कडे भरधाव वेगात असलेल्या कार क्रं एम एच 12 एसओ 3807 हिने मागून जोरदार धडक दिली या धडकेत कारचे व बसचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून एस टी महामंडळाचे अधिकारी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.