बातमी कट्टा:- मणिपूर येथे कर्तव्यावर असतांना गोळी लागून गंभीर जखमी झालेले भारतीय सैनिक निलेश महाजन यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून (आसाम)गुवहाटी येथे उपचार सुरु असतांना त्यांना विरमरण आले.त्यांच्यावर दि 28 रोजी सकाळी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मणिपूर येथे गोळी लागल्याने गंभीर जखमी झाल्याने गुवहाटी येथे आर्मी रुग्णालयात सैन्य जवान निलेश अशोक महाजन यांच्यावर उपचार सुरु असतांना विरमरण आले. त्यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, याबाबतची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. शहीद जवान निलेश महाजन यांचा मृतदेह हा गुवहाटी येथून मुंबई आणि मुंबई येथून सोनगीर येथे आणण्यात येणार आहे.आज रात्री मंगळवारी त्यांचा मृतदेह विमानाने मुंबई येथे येणार आहे.तेथून रात्री प्रवास करून इगतपुरी आणि इगतपुरी वरून सोनगीर या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात जात आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अविवाहीत असताना निलेश महाजन देशसेवेत शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सोनगीर येथे निलेश महाजन “अमर रहे”चे सर्वत्र फलक लावण्यात आले आहेत.