बातमी कट्टा:- शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटांच्या सायलेन्सरांवर कारवाई करत वाहतूक शाखेच्या पोलीसांनी रस्त्यावर सायलंन्सर ठेऊन बुलडोजर चालवून सायलंसर चिरडले आहेत. पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे धुळेकरांकडून कौतुक करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहर वाहतूक शाखेने बुलेटच्या कर्ण कर्कश्य सायलेन्सर विरोधात कारवाई केली आहे.बुलेट गाड्यांना नियमबाह्य लावण्यात आलेल्या सायलेन्सर काढण्यात आलेत.व ते सायलंन्सर रस्त्यावर ठेऊन बुलडोजर खाली चिरडण्यात आले.लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जनजागृती व्हावे आणि बेकायदेशीरपणे सायलेन्सर लावणाऱ्यांना अद्दल घडावी यासाठी हे सायलेन्सर बुलडोजर खाली चिरडण्यात आल्याचं वाहतूक शाखेच्या निरीक्षक संगिता राऊत यांनी सांगितले. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे बुलेट बहात्तरांवर वचक बसायला मदत मिळणार आहे.विचित्र आवाज काढणार्या बुलेट वर केलेल्या कारवाईचे धुळेकर नागरिकांनी स्वागत केला आहे.