शिंगावे येथे शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार,

बातमी कट्टा:- शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांसह विविध क्षेत्रातील निवृत्त कर्मचारींचा सत्कार सोहळा आज दि 5 रोजी शिंगावे येथे संपन्न झाला.शिंगावे येथील निवृत्त मुख्याध्यापक मधुकर पाटील आणि शिंगावे माजी सरपंच कल्पनाबाई मधुकर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बघा व्हिडीओ

5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून मधुकर पाटील यांच्या ग्रामस्थांनी सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दौलत आनंदा पाटील
(सेवानिवृत्त शिक्षक) उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिराम पावरा,जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे,पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

On YouTube

यावेळी प्रतिमा पुजन आणि स्वागत गित म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निवृत्त शिक्षकांसह विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार काशिराम पावरांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हणालेत की,शाळेत शिक्षण घेत असतांना गिरासे गुरुजी शिक्षक होते.आणि आज या कार्यक्रमात पहिलाच सत्कार मी गिरासे गुरुजींचा केला हे माझे नशिबच म्हणावे लागेल.यावेळी आमदार पावरा यांनी शाळेत शिक्षण घेत असतांना विद्यार्थी आणि शिक्षकांमधील प्रेमाची आठवण करुन देत अभ्यासापासून तर छडीपर्यनतची सर्व काही मनसोक्त चर्चा यावेळी आमदार पावरा यांनी उपस्थितांसोबत केल्या.

बघा व्हिडीओ

निवृत्त मुख्याध्यापक मधुकर पाटील बोलतांना म्हणाले की शिक्षक दिनी निवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मान सन्मानाने सत्कार व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो.आणि आज तो दिवस आला असल्याचे मधुकर पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पाटील विकास सोसायटी सदस्य यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी शिंगावे गावचे उपसरपंच चंद्रकांत लोटन पाटील (भुरा पाटील),प्रतिक्षा मधुकर पाटील, शिक्षिका,रिना मधुकर पाटील, शिक्षिका, स्वप्निल मधुकर पाटील, इंजिनिअर,सुजाता स्वप्निल पाटील, इंजिनिअर,ग्रा. प. सदस्य रवींद्र पाटील,गोविंदा थोरात, मंजुळाबाई पवार,ग्रा. प. सदस्य कविता बाई बागुल,ग्रा. प.सदस्य मनोहर भिल,प्रताप आधार पाटील माजी सरपंच,लोटन हिम्मतराव पाटील भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष,शशिकांत लक्ष्मण पाटील विकास सोसायटी व्हा.चेअरमन, सुभाष भाईदास पाटील माजी मुख्याध्यापक,गजानन ढोमण पाटील, हंसराज हिलाल पाटील,युवराज साहेबराव भदाने, शिंपी सर मातोश्री कॉलनी,बी एस कोळी, सर्जेराव पाटील, साळवे नाना,मुरलीधर हिलाल पाटील,अशोक एकनाथ पाटील माझी सूतगिरणी संचालक,प्राध्यापक श्री अरुण पवार,माजी सरपंच आनंद सखाराम भिल,जयवंत पाटील माजी संचालक,जिजाबराव अर्जुन पाटील, दिलीप निंबा पाटील,नवल पंडित पाटील, संजय विश्वास पाटील,देविदास भाऊराव पाटील,भाईदास सदा पाटील,सुनील भालेराव पाटील,माजी सैनिक देवगिरी नाना गोसावी,परिसरातील व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: