शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट…

व्हिडीओ

बातमी कट्टा:-महेंद्र गिरासे- धुळे जिल्ह्यातील काही भागात पाऊस व गारपीटमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. साक्री तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या सोबतच शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पाऊसामुळे नुकसान झाले होते.आज देखील सायंकाळी शिंदखेडा तालुक्यातील देवी व परिसरात १५ ते २० मिनिटे वादळी पाऊसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

On YouTube

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील वातावरणातील बदलांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने आतोनात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.तर शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात वादळी वारासह पाऊसाने रब्बी पिंकासह केळी पपई झाडांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी त्रस्त असतांना आज दि १८ रोजी सायंकाळी शिंदखेडा तालुक्यातील देवी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने देवी व सतारे भागातील गहु, कांदा,हरभरा,टमाटे,टरबूज आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या सोबतच रेवाडी वाडी भागात प्रचंड प्रमाणात पाऊसाने झोडपले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: