शिक्षकांच्या घरी भरदिवसा चोरी…

बातमी कट्टा:- धुळे शहरात देवपूर परिसरामध्ये भर दिवसा शिक्षकाच्या घरी लाखोंची चोरी उघडकीस आली आहे. भर दिवसा चोरी झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण झाले आहे.


संजय पाटील व त्यांच्या पत्नी दोघे शिक्षक असल्याने ते कामावर गेले होते,बंद घर पाहून दिवसाचं चोराने त्यांच्या घरावर डल्ला मारल्याने घरातील तीन लाखाहून अधिक रोख रक्कम तर शंभर ग्रॅमहून अधिक सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. या प्रकरणातील देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस गस्त घालतात की नाही यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. एवढी मोठी चोरी भर दिवसा होत असेल तर सर्व सामान्य नागरिकांनी बाहेर पडायचा की नाही असा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत नाही दिवसा देखील गस्त घालत नसल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आता रोष व्यक्त केला जात आहे. वारंवार धुळे शहरात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने पोलीस नेमकं करता काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: