शिरपूरचा टक्का घसरला ! कोरोना लसीकरणात पिछाडी !!

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्याची लसीकरणाची टक्केवारी मागे आहे. विशेष म्हणजे शिरपूर शहरात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याचे धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चिंता व्यक्त केली आहे.इंडइन्फ्राव्हिट उद्योगाच्या धुळे -पळासनेर टोलवे कंपनीकडून बुधवारी शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते.

शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील जिल्हा परिषद शाळेत धुळे पळासनेर टोलवे कंपनीच्या इंडईन्फ्राव्हिट उद्योग समुहाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इंड इन्फ्राव्हिट उद्योग समुहाकडून सि.एस.आर फंडातून आलेल्या निधीतून तालुक्यातील आमोदे,पिंप्री व साळदे येथील गावांतील शाळांना जलशुद्धीकरण यंत्र,एलईडी टिव्ही,संगणक संचसह विविध वस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे उपस्थित होते.त्यासोबत प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन,पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र इंगोले,सावळदे सरपंच अनिल दोरीक,उपसरपंच सचिन गिरासे,अतुल राजपूत उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले की,इतर देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणूंचा प्रभाव वाढत आहेत.अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण घेणे गरजेचे आहे.शासनाकडून वेळोवेळी कोरोना बाबत मार्गदर्शन व उपाययोजना करण्यात येत आहे.त्या नियमांचे पालन जनतेने करणे अपेक्षित आहे.धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका लसीकरणाच्या बाबतीत मागे असल्याची चिंता यावेळी व्यक्त केली.

WhatsApp
Follow by Email
error: